शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती


संस्थात्मक कामाच्या दृष्टीने पदाधिकार्यांसच्या दायित्वाचे विवरण घटनेत असले तरीही संघटनेच्या संदर्भात, निरोगी वाटचालीच्या दृष्टीने निश्चित कार्यपद्धतीचा अंगिकार करणे उचित ठरावे. सखोल चिंतन, नेटके नियोजन व कार्यक्रमांची व्यवस्थित आखणी यासाठी कामाचे विविध पैलू, कार्यकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटून घ्यावे, या कार्यकर्त्यांनी, संस्थापक/आजीव/सहयोगी/निमंत्रित सभासदांमधील अन्य काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या, त्या विषयाचा अभ्यासगट तयार करावा व त्या विषयासंदर्भात ढोबळ आराखडा कार्यकारी मंडळासमोर विचारार्थ ठेवावा, मंडळाने सविस्तर सामुहिक चिंतनानंतर त्यावर निर्णय घ्यावा. ठरलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा संबंधित कार्यकर्त्यांनी अभ्यासगटाच्या मदतीने करावा, आकस्मिक निर्णयप्रसंगी प्रमुख पदाधिकार्यांीनी त्या विषयाशी संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे, व लवकरात लवकर त्याची कल्पना कार्यकारी मंडाळाला द्यावी.

कार्यकारी मंडळासमोरील काही विषय
1.आजीव सदस्यांची नियुक्ती
2.निमंत्रित सदस्यांची यादी:अ) आयुर्वेद विश्वातील जेष्ठ व सन्माननीय व्यक्तींमधून
आ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना, संस्था व रुग्णालयांचे प्रतिनिधी उदा: वैद्यकीय
विद्यार्थी परिषद, एनएमओ, ग्राहक पंचायत वैद्यकीय विभाग, रक्तपेढ्या-
रुग्णालये व वैद्यकीय सेवा प्रकल्पांचे प्रतिनिधी
इ) वैद्यकीय पदवीधर नसलेल्या आयुर्वेद विश्वातील व्यक्तींमधून उदा: औषधी
निर्माते, संस्थाचालक, वनौषधींची लागवड करणारे, वनस्पतीशास्त्रज्ञ, प्रशासन
सेवेतील किंवा सेवानिवृत्त व्यक्ती

विविध आयाम व त्यानुसार विषयसूची

1.संघटन : संपर्क यंत्रणा, प्रवासाची योजना, विभाग, जिल्हा, नगर स्तरावर संघटनात्मक रचना. प्रांत, विभाग, जिल्हा स्तरावर
बैठका व अभ्यासवर्गांची योजना.
2.आर्थिक व्यवहार : प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर विविध स्वरूपातील निधीसंकलनासाठी निश्चित
धोरण.संस्थात्मक व संघटनात्मक कामासाठी झालेल्या जमाखर्चाचे विवरण नियमितपणे
प्रांताकडे पाठवणे.स्थानिक कर्यक्रम, उपक्रमांसाठी झालेल्या जमाखर्चाचे शेष राशीसह काटेकोर विवरण
प्रांताकडे पाठवणे.
व्यासपिठाच्या नावावर होणार्‍या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद प्रांत कार्यालयात
असणे आवश्यक.प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर जमाखर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
3.पदवीधर व व्यावसायिक सदस्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत
स्तरावर. व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी उपक्रम- व्याख्याने, परिसंवाद,
कार्यशाळा, शास्त्रचर्चासत्रे (Clinical meetings)
व्यावसायिक समस्या निराकरणासाठी प्रयत्न.ग्राहक संरक्षण कायद्याबाबत
मार्गदर्शन. शासकीय सेवेत उपलब्ध संधींची पूर्तता.
शासकीय सेवेतील पदवीधरांची सूची, संपर्क यंत्रणा, स्वतंत्र
उपक्रम.शासकीय सेवेतील पदवीधरांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न.
4.महिला वैद्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रम
5.विद्यार्थी : महाविद्यालयांची सूची, विद्यापीठ प्रमुख व महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती.
जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन:प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत.
इंटर्नीजसाठी परिसंवाद, कार्यशाळा, पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शन.अनुभवी वैद्यांकडे प्रशिक्षणाची
यो
जना.वैद्यकीय सेवाप्रकल्पांना भेटीसाठी सहलींचे आयोजन.विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न,
आंदोलन.शिक्षणानंतर पूर्णवेळ काम करण्याचे आवाहन.
6.अध्यापक : जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
समस्या निराकरणासाठी प्रयत्न, आंदोलन.
7.संस्था व संस्थाचालक : नियमित संपर्काची योजना, प्रासंगिक स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
8.सामाजिक उपक्रम: शिबिर योजना- व्याधींनुसार चिकित्सा शिबिरे व आरोग्यशिक्षण शिबिरे
शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद व तत्सम उपक्रम
सेवाप्रकल्प: उपेक्षित घटकांसाठी सेवाप्रकल्प आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सहाय्य राष्ट्रीय आरोग्यमोहिमांमध्ये सहभाग.
9. संशोधन: विविध आयुर्वेदीय संस्था व पदवीधरांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे.संशोधन संस्थांमध्ये समन्वय व
सुसुत्रता आणणे.शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेले संशोधन आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदायासमोर व समाजासमोर
प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी उपक्रम योजणे.
समन्वय: अ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना : अशा संस्था, संघटना, रुग्णालये यांच्या महत्वाच्या प्रत्येक
वैद्यकीय घडामोडीत व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी
आ) आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अन्य संस्था, संघटना, चळवळी, आंदोलने, उपक्रम: यामधील सक्रीय घटकांशी
संपर्क, व्यासपिठच्या ध्येयधोरणांशी त्यांचा परिचय व क्रमश: त्यांना व्यासपिठाच्या भूमिकेने
प्रभावित करणे. प्रांतीय, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत
व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा शक्य त्या प्रत्येक प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी.
इ) आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदाय: विविध स्तरांवर क्रमश: संपर्काची व त्यांना व्यासपिठाच्या ध्येयधोरणांशी
परिचित करण्याची व व्यासपिठाच्या भूमिकेने प्रभावित करण्याची दीर्घकालीन योजना व त्या
दृष्टीने स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
***
दि. 30.11.2000 (व्यासपिठाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गठित झालेल्या पहिल्या कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकप्रसंगी विचारार्थ तयार केलेले टिपण.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा