गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: उदगम आणि विकास

आयुर्वेद व्यासपीठ: उदगम आणि विकास

वाढता वाढता वाढे

काही तरूण कार्यकर्ते आयुर्वेदाच्या विविध चळवळीत काम करणारे,प्रवास करणारे......

भेटतात,चर्चा करतात,हळूहळू त्यातून उमलते एक स्वप्न अन् ध्यास
ते स्वप्न साकारण्याचा....

आजवरच्या उणीवा दूर करणारे,पण गरजा पूर्ण करणारे उभारुया एक सर्वसमावेषक व्यासपीठ आयुर्वेदाचे.......

‘राममळा’कोयनानगर जानेवारी 1998
महाराष्ट्राच्या अक्षरश: कानाकोपर्‍या तून जमले पाचपन्नास वैद्य.......

गहन शास्त्रचर्चेतून,तर्ककठोर वादविवादातून व थट्टामस्करीतूनही या अभ्यास वर्गात सिद्ध झाले एक रसायन......

आयुर्वेदाला नवसंजीवन देणारे हे रसायन घेऊन उत्साहाने भारलेल्या कार्यकर्त्यांनी
चौफेर कामाला प्रारंभ केला.....

आणि सुरू झाली कार्यक्रमांची,उपक्रमांची एक अखंड मालिका..
परिसंवाद,कार्यशाळा, शिबिरे,क्लिनिकल मिटींग्ज.....

शिक्षणसंस्थाचालकांच्या बैठकांपासून वनौषधी लागवड करणार्यान शेतकर्‍यांच्या मेळाव्यापर्यंत......

समस्यांच्या चर्चेसाठी आमदार नामदारांच्या भेटीपासून
पेटंट कायद्यावर विख्यात वैज्ञानिकांशी चर्चेपर्यंत.........

जेष्ठ जाणत्या वैद्यांच्या मार्गदर्शनापासून आरोग्यविज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या भेटीपर्यंत.......

शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद व स्वस्थवृत्त प्रकल्पापासून उपेक्षित वस्तीत माताबाल कल्याण केंद्र चालवण्यापर्यंत.......

राममळ्याच्या शृंखलेत खेडशिवापूर,नाशिक,सांगली....
वाढत्या संख्येच्या व गुणवत्तेच्या अभ्यासवर्गांची मालिका सुरू झाली...

आयुर्वेदाच्या इतिहासात प्रथमच शिक्षणानंतर
पूर्णवेळ आयुर्वेद प्रचार प्रसाराचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली..

कुठल्याही पदाची इच्छा न बाळगता स्वकष्टाने व स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या‍ कार्यकर्त्यांच्या आधारावर आज....

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात नियमित क्लिनिकल मिटींग्ज,
विविध कार्यशाळा, परिसंवाद, शालेय प्रकल्प

आणि आयुर्वेदाच्या इतिहासात प्रथमच
1500 स्त्री वैद्यांचा नाशिकचा भव्य राज्यस्तरीय परिसंवाद ‘यशस्विनी’

तपस्वी वैद्यांपासून उत्साही विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षणतज्ञांपासून कारखानदारांपर्यंत
आयुर्वेदाच्या उत्थानाची व प्रगतीची आकांक्षा बाळगणार्या् सर्वांचे नगरचे भव्य एकत्रीकरण व्यासपीठाची दमदार वाटचाल सुरूच आहे, सर्वांना हार्दिक आवाहन करत

“आयुर्वेदाच्या महारथा या सारे मिळूनी ओढू या”
***


कारवा बढता गया

कुछ युवक कार्यकर्ता आयुर्वेद के अन्यान्य आंदालनोमे काम करनेवाले,प्रवास करनेवाले......

मिलते है,चर्चा करते है,धिरेधिरे उसमेसे उदीयमान होता है एक स्वप्न
और उसे साकार करनेकी एक आस....

आजतककी कमियां दूर करनेवाला,लेकिन आवश्यकताओको पूरा करनेवाला निर्माण करेंगे एक सर्वसमावेषक व्यासपीठ आयुर्वेदका.......

‘राममला’कोयनानगर जनवरी 1998 महाराष्ट्रके दूरदराज के शहर गाव से इकट्ठा हुए पाचपचास वैद्य.......

गहन शास्त्रचर्चा,तर्ककठोर वादविवाद के साथसाथ हंसीमजाकसे ओतप्रोत इस अभ्यास वर्गमे सिद्ध हुआ एक रसायन......

आयुर्वेदको नवसंजीवनी देनेवाला यह रसायन लेकर उत्साहसे पूर्ण कार्यकर्ताओने दसो दिशाओमे कार्य प्रारंभ किया.....

और शुरू हो गयी कार्यक्रमोकी,उपक्रमोकी एक अखंड मालिका.. परिचर्चा,कार्यशाला,शिबिर,क्लिनिकल मिटींग्ज.....

शिक्षासंस्थाओके संचालकोकी बैठक से लेकर वनौषधी बोनेवाले किसानोके मेलेतक......

समस्या सुलझानेके लिए विधायकोसे तथा मंत्रीगणोसे लेकर पेटंट कानून के बारेमे विख्यात वैज्ञानिकोसे विचारविमर्श .........

जेष्ठ जानकार वैद्यविदोके मार्गदर्शनसे लेकर स्वास्थ्यविज्ञान विश्वविद्यालय के कुलगुरूके साथ भेटवार्त्ता तक.......

विद्यालयोके शिक्षाक्रममे आयुर्वेद तथा स्वस्थवृत्त प्रकल्पसे लेकर सेवाबस्तीमे माताबालक कल्याण केंद्र चलानेतक.......

राममलेकी शृंखलामे खेडशिवापूर,नासिक,सांगली, आदि बढती संख्याके तथा गुणवत्ताके अभ्यासवर्गोकी मालिका ...

आयुर्वेदके इतिहासमे पहलीबार
शिक्षा के पश्चात पूर्णकालीन आयुर्वेद प्रचार प्रसारका कार्य करनेवाले कार्यकर्ताओकी टोली ..

किसीभी स्थान तथा लाभ की इच्छा न रखते हुए अपने कष्टसे और खर्चेसे संपूर्ण महाराष्ट्रका भ्रमण करनेवाले कार्यकर्तांओके बलपर आज....

महाराष्ट्रके अनेक जिलोमे नियमित क्लिनिकल मिटींग्ज,कार्यशालाए, परिचर्चाए,
विद्यालयोके पाठ्यक्रमोमे आयुर्वेद प्रकल्प..

और आयुर्वेदके इतिहासमे पहलीबार 1500 महिला वैद्योका विशाल राज्यस्तरीय संम्मेलन नासिक मे संपन्न.....
तपस्वी वैद्योसे लेकर छात्रोतक और शिक्षाविदोसे लेकर औषधी निर्माताओतक

आयुर्वेदके उत्थानकी और प्रगतीची आकांक्षा रखनेवाले सभीका नगरमे संगम व्यासपीठ की सशक्त यात्रा आगे बढ रही है सभीसे हार्दिक आवाहन करते हुए, आओ.........

हृदयमे भक्ति,हाथोमे शक्ति और पैरोमे गति लेकर

आयुर्वेदके इस महारथ को आगे बढाए ..
****



श्री धन्वंतरये नमः

कृण्वंतो विश्व स्वस्थम्

आयुर्वेदाच्या वटवृक्षाला नवी पालवी

हजारो वर्षांची समृद्ध प्राचीन परंपरा
असलेल्या व काळाच्या कठोर कसोटीवर श्रेष्ठतम उपचारपद्धती
म्हणून सिद्ध झालेल्या आयुर्वेदाच्या वटवृक्षाला फुटलेली नवी पालवी म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्य तितुका मेळवावा 
या भावनेने भारलेल्या तरूणांनी आयुर्वेदाच्या वटवृक्षाला बलशाली करणार्‍या.
सर्व घटकांना संघटनेच्या सुत्रात गुंफण्यासाठी आरंभलेले नवे पर्व म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

या आयुर्वेदाच्या वटवृक्षाची छाया
समाजाच्या सर्व अंगांपर्यंत पोहोचावी म्हणून घराघरात,शाळेत,कार्यालयात
आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उपक्रमांची नवी मालिका म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

गहन संहिताग्रंथांचे पाथेय
अगणित प्रज्ञावान वैद्यांची समर्थ परंपरा आणि आधुनिक शास्त्रीय निकषांनाही मान्य झालेल्या
परिणामकारक उपचार पद्धतीच्या प्रत्ययातून उठणारा आत्मविश्वासाचा नवा हुंकार
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आधुनिक वैद्यकतंत्राचा पगडा
शासनाची अनास्था,समाजाची उदासीनता आणि व्यावसायिकांमधील न्यूनगंड यातून
फोफावलेल्या समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्षाचा नवा नारा
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाचे मूळ अधिष्ठान
अभंग राखून,आधुनिक वैज्ञानिक प्रगतीचा डोळस अंगिकार करून आजची आव्हाने
समर्थपणे पेलू शकणार्याा शिक्षणपद्धतीच्या विकासाची नवी उभारणी म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

शास्त्रोक्त सिद्धांत व ज्ञानाची विस्तारणारी क्षितिजे
यांच्या संयोजनातून आजच्या वैद्यक क्षेत्रातील आव्हानांचा स्विकार करून
संशोधनाच्या नव्या दिशांचा शोध म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्यकीय व्यवसायाचे आजचे चित्र त्यात शिरलेल्या अपप्रवृत्ती,
त्यामुळे निर्माण झालेला अविश्वास व संशय दूर सारून
या व्यवसायात पुन्हा सेवाभाव व नैतिकता रुजवण्याचा नवा संकल्प म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाच्या उत्थानासाठी
कार्यरत देशविदेशातील व्यक्ती,संस्था,संघटना,चळवळी व उपक्रम
स्नेहाने व आत्मियतेने जोडण्याचा नवा ध्यास
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

***

श्री धन्वंतरये नमः

कृण्वंतो विश्व स्वस्थम्

आयुर्वेदके वटवृक्षका नवोन्मेष

हजारो वर्षोकी समृद्ध प्राचीन परंपरा का अधिष्ठान
और काल की कठोर कसौटीपर निखरी श्रेष्ठतम उपचारपद्धती
इस आयुर्वेदके वटवृक्षका नवोन्मेष यह है आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्य सभी संगठित हो 
इस भावनासे अभिभूत युवकोद्वारा आयूर्वेदके वटवृक्षको बलशाली करनेवाले
सभी घटकेाको संघटनसूत्रमे बांधनेका नया पर्व यह है आयुर्वेद व्यासपीठ...

इस आयूर्वेदके वटवृक्षकी छाया
समाजके सभी अंगोतक पहुचाने के लिए घरघरमे,विद्यालयोमे,दफ्तरोमे
आयुर्वेदका प्रसार और प्रचार करनेके लिए उपक्रमोकी नयी मालिका यह है आयुर्वेद व्यासपीठ...

गहन संहिताग्रंथोका पाथेय
अगणित प्रज्ञावान वैद्यविदोकी समर्थ परंपरा और आधुनिक विज्ञान को भी मान्य
प्रभावशाली उपचारप्रणालीके अध्ययनसे
उठनेवाला आत्मविश्वासका नया स्वर यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आधुनिक चिकित्साविज्ञानका दबाव
शासनकी अनास्था,समाजकी उदासीनता और वैद्योमे व्याप्त न्यूनगंडसे
बढी हुयी समस्यांओके चक्रव्यूहको भेदनेकेलिए संघर्षकी नयी लहर यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाके मूल अधिष्ठानको अक्षुण्ण रख आधुनिक विज्ञानके प्रगतीको स्विकार कर
आजकी चुनौतियोका सामना करने मे सक्षम
शिक्षाप्रणालीके विकासकी नयी नीव यह है आयुर्वेद व्यासपीठ...

शास्त्रके सिद्धांत और आज ज्ञानके क्षेत्रमे हो रहा विकास
इनके संयोजनद्वारा आजके चिकित्साजगत की
सभी चुनौतियोको स्विकार कर
अनुसंधानको सही दिशा देनेका प्रयास यह है आयुर्वेद व्यासपीठ...

चिकित्साजगतकी आजकी स्थिती
उसमे व्याप्त कुरितीयां उनके कारण से निर्माण हुआ अविश्वास और आंशंकाएं
इन सबको दूर कर इस
क्षेत्र मे पुनः सेवाभाव तथा नैतिकता जगानेका नया संकल्प
यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदके उत्थानके लिए
देशविदेशमे कार्यरत सभी व्यक्तीसंस्थासंगठन आंदोलन तथा उपक्रमोको
स्नेह और आत्मियताके भाव से जोडनेकी नयी पहल
यह है आयुर्वेद व्यासपीठ...

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा