गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

अभ्यासवर्गासाठी प्रारूप

अभ्यासवर्गासाठी प्रारूप
दोन दिवसांच्या अभ्यासवर्गात पहिला दिवस प्रामुख्याने कार्यक्रम व तपशिलासाठी, तर दुसरा दिवस ध्येयधोरणे व दिशादर्शनासाठी असावा. दोन्ही दिवशी एक गटश: सत्र व एक मुक्तचिंतनाचे सत्र असावे.
पहिला दिवस
1. आयुर्वेदासाठी कर्यरत संघटना व चळवळींचा इतिहास, आजच्या आव्हानांना पेलण्याची त्यांची क्षमता.
2. आयुर्वेद व्यासपिठाची आवश्यकता, भूमिका, संकल्पना, उद्दिष्टे व वाटचाल.
3. जिल्हाश: परिचय व निवेदने .
4. आदर्श नियोजन – शिबिर, कार्यशाळा, परिसंवाद, शास्त्रचर्चासत्र, संशोधन प्रकल्प.
5. श्रेणीश: बैठका – व्यावसायिक, विद्यार्थी, प्राध्यापक, स्त्रीवैद्य. पदाधिकार्यां च्या बैठका – अध्यक्ष/उपाध्यक्ष, कार्यवाह/सहकार्यवाह, कोषाध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, महाविद्यालय
प्रमुख
6. मुक्तचिंतन: व्यासपिठाच्या कार्यवाढीसाठी विविध उपक्रम.

दुसरा दिवस

1. भारताचा सांस्कृतिक वारसा व आजच्या समस्यांची उत्तरे, विश्वगुरू भारत (एक गुलाम देश ते महासत्ता)
2. शास्त्रचर्चासत्र.
3. मुक्तचिंतन: वैद्यकक्षेत्रातील/आयुर्वेदासमोरची आजची आव्हाने व त्यांचे निराकरण.
4. कामाचा आधार कार्यकर्ता: कार्यकर्त्याचा विकास.
5. जिल्हाश: बैठका: कार्यवाढीचा संकल्प, आगामी कार्यक्रम.
6. समारोप- यशाने दुमदुमवू त्रिभुवने.
***
 शक्य त्या सर्व सत्रांची (1,2,4/1ला व 2रा दिवस) टिपणे वर्गापूर्वी एकत्र करून समारोपानंतर वितरण.
 पहिल्या दिवशीच्या सत्र 4 मध्ये एकेका कार्यकर्त्याने एकेका उपक्रमाच्या नियोजनाचे प्रारूप मांडावे.
 पहिल्या दिवस अखेरीस कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी किमान कार्यक्रम निश्चित करून दुसर्यान दिवशीच्या 4 थ्या सत्राच्या शेवटी त्याची घोषणा, जिल्हाश: बैठकीत त्याची योजना व समारोपाच्या सत्रारंभी त्याचे निवेदन.
 पहिल्या दिवशी पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात उदघाटन, संध्याकाळी खेळ/भ्रमण, रात्री विविधगुणदर्शन. दुसर्‍या दिवशी पहाटे योगासने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा